VVPAT Demand : विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाची EC ला भेट अन् ठाकरे बंधूंची आग्रही एकच मागणी, निवेदनात नेमकं काय म्हटलंय?
विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन व्हीव्हीपॅटच्या वापराची आग्रही मागणी केली. ठाकरे बंधूंनीही या मागणीला दुजोरा दिला. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेबाबत आणि मतदार याद्यांच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबई महानगरपालिका निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीही करण्यात आली.
मतदानासंदर्भात विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यामध्ये ठाकरे बंधूंनी व्हीव्हीपॅटच्या वापराची आग्रही मागणी केली आहे. जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या पुन्हा सर्व नेते राज्य निवडणूक आयोगाला भेटणार असून त्यानंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. निवेदनात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्ष आणि सामान्य माणसांच्या मनात शंका आहेत. निवडणूक आयोग खरोखरच स्वायत्त आहे का, असा सवाल विरोधी पक्षाकडून विचारण्यात आला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून वगळलेल्या नावांची यादी सार्वजनिक न करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार वर्षे पुढे ढकलणे, यावरही आक्षेप घेण्यात आले. जर निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम देऊ शकत नसेल, तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. या मागण्या केवळ राजकीय पक्षांच्या नसून, सामान्य जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांचे प्रतिबिंब आहेत, असे शिष्टमंडळाने म्हटले आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

