Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन केले. काँग्रेससह इंडिया आघाडीतील खासदारांनी हातात "अमित शाह संसद से गायब क्यों?" असे लिहिलेले फलक घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन केले. काँग्रेससह इंडिया आघाडीतील खासदारांनी हातात “अमित शाह संसद से गायब क्यों?” असे लिहिलेले फलक घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
या आंदोलनात काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियांका गांधी वाड्रा, काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक खासदार सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत उपस्थित राहून उत्तर द्यावे, अशी मागणी केली.
यावेळी आंदोलक खासदारांनी “चंदा चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी”, “अमित शाह जवाब दो, जवाब दो” अशा घोषणांनी संसद परिसर दणाणून सोडला. विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून विरोधकांनी हे आंदोलन केल्याचे सांगितले.
दरम्यान, विरोधकांच्या आंदोलनामुळे संसद परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले. संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात विविध राष्ट्रीय मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Published on: Jul 31, 2026 01:28 PM
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...

