VIDEO : Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध, खासदार Brij Bhushan Singh यांची भव्य रॅली
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज एक बैठक पार पडणार आहे. खासदार बृजभूषण सिंह यांनी कार्यकर्ते आणि साधू, महंतांसोबत बैठकीचं आयोजन केलंय. या बैठकीत राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. राज ठाकरेंनी माफी मागितली नाही, तर त्यांना अयोध्येत पायही ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका बृजभूषण सिंह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज एक बैठक पार पडणार आहे. खासदार बृजभूषण सिंह यांनी कार्यकर्ते आणि साधू, महंतांसोबत बैठकीचं आयोजन केलंय. या बैठकीत राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. राज ठाकरेंनी माफी मागितली नाही, तर त्यांना अयोध्येत पायही ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका बृजभूषण सिंह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह राज ठाकरेंविरोधात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी नंदिनीनगरमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला अयोध्यातील साधू संतासह परिसरातील 50 हजार उत्तर भारतीय नागरिक उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातंय. या बैठकीत राज ठाकरेंना कसं रोखायचं याबाबत रणनीती ठरवण्यात येणार आहे.
Published on: May 10, 2022 12:27 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

