बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश; राज्यपालांचे पोलीस आयुक्तांना पत्र
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते बंडखोर आमदारांविरुद्ध आक्रमक झाले असून अनेकांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचे वृत्त आहे. अशातच बंडखोर आमदारांच्या कुटुंबाचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले आहे. केंद्रीय सचिवालयाचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाल्यानंतर […]
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते बंडखोर आमदारांविरुद्ध आक्रमक झाले असून अनेकांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचे वृत्त आहे. अशातच बंडखोर आमदारांच्या कुटुंबाचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले आहे. केंद्रीय सचिवालयाचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाल्यानंतर राज्यपालांनी स्वतः पत्र लिहीत मुंबई पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस महासंचालक यांना सुरक्षा वाढविण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार आसामच्या गुवाहाटीमध्ये वास्तव्यास आहेत. अद्याप महाराष्ट्रात येण्याबाबत त्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. शिंदे गटाच्या बंडाविरुद्ध गेल्या दोन दिवसांपासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत, याच पार्श्वभूमीवर राज्यपाल कोशारी यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
