सांगलीत रुस्तम-ए-हिंद शर्यतीचा थरार, बकासूर अन् महिब्या बैलजोडी नंबर 1
VIDEO | लाखो बैलगाडा शौकीनांच्या उपस्थिती सांगलीच्या भाळवणी येथे पार पडला बैलगाडी शर्यतीचा थरार, कुणी पटकावली थार गाडी?
सांगली : लाखो बैलगाडा शौकीनांच्या उपस्थिती सांगलीच्या भाळवणी येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीमध्ये पुण्याच्या बकासूर व कराड रेठरेच्या महीब्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली आहे. अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अश्या या बैलगाडा शर्यती पार पडल्या. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने सांगलीच्या विटा नजीकच्या भाळवणी येथे रुस्तूम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 10 एकर परिसरातील माळारानावर ऐतिहासिक बैलगाडी स्पर्धा पार पडल्या.ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, मुंबई आणि कर्नाटक राज्यातून सुमारे 200 बैलगाडी स्पर्धेक सहभागी झाले होते. देशातील सगळ्यात मोठया बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडी शौकीनांनी हजेरी लावली होती.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

