AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Attack New Video : पहलगाम हल्ल्यानंतरचा आणखी एक CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्..

Pahalgam Attack New Video : पहलगाम हल्ल्यानंतरचा आणखी एक CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्..

| Updated on: May 05, 2025 | 10:05 AM

पहलगाम येथील बैसरन व्हॅलीच्या बाजारपेठेत असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांची धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला करुन २६ पर्यटकांची हत्या केली. या पहलगाम हल्ल्याचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन व्हॅली येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतरचा असल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळी बैसरन व्हॅली येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर बैसरन घाटीच्या बाजारपेठेत पर्यटकांची धावपळ सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पहलगामच्या बैसरन व्हॅलीच्या बाजारपेठेत बसवलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये हल्ल्यानंतर पर्यटकांची धांदल उडाल्याचे कैद झाले आहे. बाजारपेठेतील सीसीटीव्हीच्या या व्हिडीओमध्ये पर्यटक जीव मुठीत घेऊन पळत असल्याची दृश्य कैद झाली आहेत. ज्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला यानंतर गोळ्यांचा आवाज बाजारपेठेत देखील ऐकायला मिळाला. समोर आलेला व्हिडीओ क्लिअर नसला तरी यामध्ये पर्यटकांची धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळतंय.

Published on: May 05, 2025 10:05 AM