AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Attack : 9 तारखेच्या आतच पाकचं काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?

Pahalgam Attack : 9 तारखेच्या आतच पाकचं काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?

| Updated on: May 05, 2025 | 9:10 AM

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावलं आहे. दहशतवादी आणि त्यांना पोहोचणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करणार असं पुन्हा एकदा मोदी यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे मोदीं पाठोपाठ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील आपला रशियाचा दौरा रद्द केला आहे. त्यामुळे 9 तारखे आधी मोठी कारवाई होणार का? अशी चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावरून पुन्हा एकदा बदला घेण्याचा इरादा बोलून दाखवला. दहशतवादी आणि दहशतवादांना पोसणाऱ्यांवर कडक कारवाई होणार म्हणून पाकिस्तानचे साफ शब्दात त्यांनी कान गरम केले. मोदींनी तिन्ही दलाच्या आर्मी प्रमुखांसोबत तीन वेळा बैठका घेतल्या. आर्मीला मोदींनी फ्री हँड ही दिला आहे आणि त्यांनाच कशा प्रकारे कारवाई करायची हे ठरवण्याचाही अधिकार दिला आहे. त्यासोबतच मोदीं पाठोपाठ आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही आपला रशिया दौरा रद्द केला.

9 मे रोजी रशियाचा विजय दिवस कार्यक्रम आहे. पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचा हा दौरा रद्द केला. मोदींच्या ऐवजी त्या ठिकाणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे रशियाला जाणार होते पण त्यांनीही आता हा दौरा रद्द केला. आता भारताकडून संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे रशियाला विजय दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे 9 तारखेच्या आधीच पाकिस्तानी दहशतवादी आणि त्यांच्या आकाचा खात्मा होऊन मोठ काहीतरी होणार असे संकेत आहेत.

हल्ला होणार म्हणून पाकिस्तान प्रचंड घाबरलेला आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदे समोर हात जोडण्याची तयारीही केलीये. तसच भारताच्या जवळचा असलेला सौदी अरेबिया समोर सुद्धा हात पसरले. दरम्यान पाकिस्तान नेमकं का घाबरला आहे त्याची कारण म्हणजे पंतप्रधान मोदी राजनाथ सिंह आणि अमित शहा हे बदला घेणार हे वारंवार सांगताहेत. पण पाकिस्तानात हल्ला कसा असेल कोणती कारवाई असेल यावर थेट बोलत नाहीयेत.

Published on: May 05, 2025 09:10 AM