Operation Mahadev : ट्रॅक केलं, घेरलं अन् गेम ओव्हर… पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले, ज्यांचा पहलगाम हल्ल्याशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
एक मोठी माहिती समोर येत आहे. काश्मीरच्या खोऱ्यात सुरक्षा दलाकडून तीन अतिरेक्यांना खंठस्नान घालण्यात आलंय. मारले गेलेले अतिरेकी पहलगाम हल्ल्याशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. श्रीनगरजवळच्या लिडवासमध्ये भारतीय सैन्याकडून ऑपरेशन महादेव राबवण्यात आलंय. यावेळी ही मोठी कारवाई भारतीय सैन्याकडून जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आल्याची माहिती मिळतेय. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात निष्पाप २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता.
दरम्यान, यानंतर भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर राबवून चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते. यानंतर तब्बल ९६ दिवसांनी भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल सुरू केलेले ऑपरेशन महादेव आता दहशतवाद्यांचा गेम ओव्हर होण्याची संकेत आहेत. ९६ दिवसांनंतर ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याने ड्रोन आणि हेरगिरीचा वापर करून दहशतवाद्यांचा ट्रॅक करून घेरले. ज्यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले. भारताने स्वदेशी तंत्रज्ञान आणि रणनीती वापरून दहशतवादाला करारा जवाब दिला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

