Ambadas Danve : पेनड्राईव्ह अन् पुरावे थेट राज्यपालांकडे, राज्यातील ‘या’ मंत्र्यांचं पद धोक्यात, दानवे म्हणाले ….म्हणून आम्ही राजभवनात
सध्याच्या मंत्र्यांच्या वर्तवणुकीमुळे लोकशाहीला धक्का लागत आहे आणि त्यांचे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणे सुरू आहे. या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. राजभवन येथे झालेल्या राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या भेटीत हनी ट्रॅपशी संबंधित पुरावे सादर केल्याची माहिती समोर येतेय. माणिकराव कोकाटेंसारख्या व्यक्तींची वादग्रस्त वक्तव्य, विधिमंडळात रमी खेळणं हे अत्यंत वाईट आहे. हॉटेल व्हिट्स आणि करोडो रुपयांच्या पैशांचा व्हिडिओ आणि सातत्याने उर्मटपणाचे वक्तव्य करणारे मंत्री संजय शिरसाट यांचे पायउतार होणे गरजेचे असे ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितले तर कलंकित मंत्र्यांचे राजीमाने घेण्याची मागणी देखील ठाकरेंच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली.
पेनड्राईव्हसहित पुराव्यांची फाईल, पुरावे राज्यपालांकडे सादर केल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले, कलंकित मंत्र्यांना ताबडतोब बडतर्फ करण्याची आमची मागणी आहे. यासह मंत्री संजय शिरसाट आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

