Pakistan : चोराच्या उलटा बोंबा… पाकिस्तानचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही, आम्हीच दहशतावादाचे शिकार
पाक अतिरेकी अड्डे चालवतो, असं पाकचा संरक्षण मंत्री ख्वाजा आफीज यानेच काही दिवसापूर्वी कबूल केलं होतं. मात्र आता पाककडून चोराच्या उलटा बोंबा पाहायला मिळताय. पाक म्हणतंय आम्ही शांततावादी, आमचा देश दहशतवादाचा बळी ठरलाय.
भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. त्यांची भिती आता जगासमोर यायला लागली आहे. शेजारील देशाचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी रात्री देशाला संबोधित करताना एक मोठं विधान केले आणि भारताला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी पोकळ धमकी दिली. पाक पंतप्रधान देशवासियांना उद्देशून म्हणाले की, आपण आपल्या देशाच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. त्यांनी दावा केला की पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले असून काही तासांतच भारताला माघार घ्यायला लावली आहे. मात्र पाकने भारतावर केलेल्या हल्ल्याचा डावानंतर भारतीय लष्कराकडून पाकड्यांचा प्लान उधळून लावण्यात आलाय. अशातच पाकने एक मोठी कबुली दिल्याचे दिसतंय. अतिरेकी पोसणं हा पाकिस्तानचा इतिहास राहिलाय, या दाव्याशी सहमत आहात का? असा सवाल पाक पंतप्रधानांना केला असताना त्यांनी ते मान्य करत हे कृत्य अमेरिकेच्या सांगण्यावरून पाक ३० वर्षांपासून करत असल्याचे म्हटले. भारताकडून दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले यात कोणत्याही रहिवाशी भागात सैन्याला टार्गेट केलं नाही, पण पाककडून पाकिस्तानी नागरिक मारले गेल्याचा खोटा दावा करण्यात आला. आता पाकिस्तानात एकही अतिरेकी अड्डा नाही. आम्हीच दहशतावादाचे शिकार आहोत, असं पाककडून म्हटलं जातंय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

