AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashadi Wari | विश्वस्तांच्या बैठकीत वारीसंदर्भातील सरकारच्या निर्णयाला तत्वतः मान्यता - विकास ढगे

Ashadi Wari | विश्वस्तांच्या बैठकीत वारीसंदर्भातील सरकारच्या निर्णयाला तत्वतः मान्यता – विकास ढगे

| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 8:22 PM
Share

राज्य सरकारने घेतलेल्या बसने पालखी नेण्याच्या निर्णयाला जरी वारकऱ्यांनी सहमती दर्शवली असली तरी वारकरी प्रतिनिधींनी काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत.

पुणे : आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या परंपरेतरा सगळ्यात मोठा सोहळा! लाखो वारकरी पंढरपुरात जमतात, तेव्हा वैष्णवांचा मेळा भरतो. गेल्यावर्षी कोरोनामुळे पायी वारीची सेवा खंडीत झाली. ज्ञानोबा, तुकोबा आणि इतर मानाच्या पालख्या या बसनेचं पंढरपूरला न्याव्या लागल्या. यंदातरी वारी होईल, अशी वारकऱ्यांची इच्छा होती. मात्र आता सरकारने बसनेच पादूका नेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला देहू, त्याचबरोबर आळंदी देवस्थाननंही विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. मात्र वारीसाठी काही दिवस शिल्लक असताना नियोजनासाठी घेतलेल्या बैठकीत दहाही संस्थानांच्या विश्वस्तांनी शासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

सरकारचा निर्णय मान्य पण, काही प्रमुख मागण्या

दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या बसने पालखी नेण्याच्या निर्णयाला जरी वारकऱ्यांनी सहमती दर्शवली असली तरी वारकरी प्रतिनिधींनी काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. “राज्य सरकारचा निर्णय मान्य आहे. पण प्रस्थान सोहळ्याला देण्यात आलेली 100 वारकऱ्यांची परवानगी ही मर्यादा वाढवा. वाखरीपासून पायी चालत जाण्यास परवानगी आहे, मात्र त्याची रुपरेषा जाहीर करा. शासनाने निर्णय जाहीर केलाय. मात्र अद्यापही लेखी आदेश मिळाला नाही, तो जाहीर करा”, अशा प्रमुख मागण्या वारकरी प्रतिनिधींनी सरकारकडे केल्या आहेत

Published on: Jun 13, 2021 06:30 PM