Beed | भगवान गडावर दसरा मेळाव्याला परवानगी, पंकजा मुंडेंचं समर्थकांना आवाहन

तब्बल दोन वर्षानंतर बीडमध्ये भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. स्वत: खासदार प्रीतम मुंडे यांनी काल या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. (Pankaja Munde appeal party workers ahead dasara melava)

तब्बल दोन वर्षानंतर बीडमध्ये भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. स्वत: खासदार प्रीतम मुंडे यांनी काल या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर पंकजा मुंडे यांनीही एक व्हिडीओ ट्विट करून समर्थकांना भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा!!, असं पंकजा मुंडे या व्हिडीओतून सांगताना दिसत आहेत.

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी समर्थकांना दसरा, दसऱ्याची परंपरा, भगवानगडाचं महत्त्व, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं भगवान गडाशी असलेलं नातं आणि त्यांचं स्वत:चं भगवानगड आणि दसरा मेळाव्याशी असलेलं नातं यावर प्रकाश टाकला आहे. तसेच आपल्या समर्थकांना त्यांनी अत्यंत भावनिक आवाहन करून दसरा मेळाव्याला येण्याचं आवतन दिलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI