Pankaja Munde | पालकमंत्री फक्त बँनरवर दिसतायेत, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका
पंकजा मुंडे यांनी यावेळीही बंधू धनंजय मुंडेंवर टीकास्त्र करण्याचं सोडलं नाही. बीडचे पालकमंत्री सध्या पोस्टर- बॅनरमध्येच दिसतात अशी मिश्किल टीका पंकजा यांनी धनंजय यांच्यावर केलीय.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे आणि याच जयंतीनिमित्त त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी नवीन संकल्प हाती घेतलाय. कष्टकरी मजुरांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज त्या थेट ऊसाच्या फडात पंकजा पोहचल्या. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून आज पंकजा मुंडे यांनी देखील सर्वसामान्यांसोबतची नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळीही बंधू धनंजय मुंडेंवर टीकास्त्र करण्याचं सोडलं नाही. बीडचे पालकमंत्री सध्या पोस्टर- बॅनरमध्येच दिसतात अशी मिश्किल टीका पंकजा यांनी धनंजय यांच्यावर केलीय. पंकजा मुंडेंचा रोख लक्षात घेता येणाऱ्या सर्वच निवडणुकीत बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुंडे भावंडं पुन्हा एकदा आमनेसामने येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

