पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवर राऊतांचं मोठं विधान, म्हणाले निवडणूक…
मराठवाड्यात ठाकरे गटाचे 4 उमेदवार विजयी होतील. राज्यात महाविकास आघाडी 35 हून अधिक जागा जिंकणार. संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Sanjay Raut : महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचे दौरे सुरु झाले आहेत. अशातच आज खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असताना म्हटलं आहे की, बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही. मराठवाड्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. मराठवाड्यातील ठाकरे गटाचे 4 उमेदवार विजयी होतील. राज्यात महाविकास आघाडी 35 हून अधिक जागा जिंकणार. 20 जागांवर आम्ही भाजपचा पराभव फिक्स केलाय. त्याच बरोबर नांदेडचा आदर्श टॉवर कोसळणार असं म्हणत संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मराठवाड्यात ठाकरे गटाचे 4 उमेदवार विजयी होतील. राज्यात महाविकास आघाडी 35 हून अधिक जागा जिंकणार. 20 जागांवर आम्ही भाजपचा पराभव फिक्स केल्या. संभाजीनगरमध्ये अनेकजण आम्हाला पाठिंबा देत आहेत. वंचितने महाविकास आघाडीसोबत यावं यासाठी आम्ही विनवण्या केल्या आहेत. त्यांना 6 जागा देऊ केल्या होत्या. आजही प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे