राजकारण आम्हाला ही कळतं; संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकरांवर प्रहार

Sanjay Raut on Ambedkar : महाविकास आघाडी आणि वंचित मोट बांधता बांधता राहिली. त्यावरुन दोघे पण एकमेकांवर टीका करत आहेत. काल प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीने 20 जागा 'फिक्स' केल्याचा आरोप लगावला होता. त्यावर आम्हाला पण राजकारण कळतं, असा चिमटा खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना काढला आहे.

राजकारण आम्हाला ही कळतं; संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकरांवर प्रहार
संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 11:20 AM

महाविकास आघाडीने 20 जागा भाजपसाठी ‘फिक्स’ केल्याचा गंभीर आरोप वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी लगावला होता. या जागांवर भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर आम्हाला पण राजकारण कळतं, असा चिमटा खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांना काढला. संविधान वाचविण्याच्या या लढ्यात आंबेडकरांच्या भूमिकेची नोंद जनता घेत असल्याचे त्यांनी ठणकावले. रोजचे शाब्दिक वाद होत असले तरी, वंचितसाठी महाविकास आघाडीचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंबेडकर यांनी वेगळी भूमिका घेतली

महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रकाश आंबेडकर यांना प्रेमाने हातही जोडले. आपण चळवळीचा नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे. या देशात लोकशाही धोक्यात आहे हुकूमशाही धडक मारते आपल्या धडका मारते आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर असावे त्यांना सहा जागा देऊ केल्या. पण त्यांनी बाहेर काही वेगळेच सांगितले. माझ्या भूमिकेचे महाविकास आघाडीतील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी समर्थन केले. या सगळ्यांनी विनंती केली होती या आपण एकत्र जाऊ कायम आदरभाव घेऊ आणि त्यांचा एक मार्ग स्वीकारले पण तरीसुद्धा कधीतरी आमच्या रस्ते एकत्र येतील देश संकटात असताना संविधान संकटात असताना एकत्र राहत नाहीत मला असं वाटतं की देश त्याची नोंद घेईल. त्यामुळे आमची इच्छा होती की आमच्या आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीच्या या महायात्रेमध्ये सामील करून घेता यावं पण त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निकाल वेगळा होता. आजही आम्ही सांगतो की त्यांच्यासाठी आम्ही सदैव आमचे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत.

हे सुद्धा वाचा

पंकजा मुंडे यांना अवघड वाट

शिवसेनेचे मराठवाड्यातले चारही उमेदवार, शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल नांदेड असेल बीड असेल इथे सुद्धा जिंकण्याची दाट शक्यता आहे. यावेळी जालना आणि लातूरला बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी तुम्हाला आत्ता खात्रीने सांगतो बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपे राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल. देवेंद्र फडणवीस 45 चा आकडा सांगतात. आम्ही आमच्या 35 जागांहून अधिक जागांवर जिंकण्याच्या दाव्यावर ठाम आहोत.

रद्द केलेली नोट म्हणजे मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नाणं चालता म्हणात. मग 2000 रुपयांची नोट का चालत नाही. ती बाद झाली आहे. ती रद्द केलेली आहे. ही रद्द केलेली नोट म्हणजेच मोदी आहेत. ते पण या देशात चालणार नाहीत, अशी जोरदार टीका त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.