Pankaja Munde UNCUT | पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत ते मराठा, ओबीसी आरक्षणासह व्यसनमुक्ती, दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंची जोरदार बॅटिंग

तुम मुझे कब तक रोकोगे? मुठ्ठी मे सपने लेकर जेबोमे कुछ आशाए, दिल में अरमान यहीं की कुछ करजाएँ, सूरजसा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझे कबतक रोकोगे? अपनी हद रोषण करने से तुम मुझे कैसे रोकोगे, कैसे टोकोगे?, अशा शायराना अंदाजात पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका भगवानबाबांच्या भक्तांसमोर मांडली.

मला वाटलं मी इथे येऊ शकणार नाही. माझ्या मनात चारोळ्या आल्या. तुम मुझे कब तर रोकोगे? जानकर साहेब भाषण करताना इंग्रजीत बोलत होते. ओबीसी माणूस पेटला तर इंग्रजीत बोलतो. मध्येच हिंदी बोलतात. कारण त्यांना देशाची लिडरशीप आहे. तुम मुझे कब तक रोकोगे? मुठ्ठी मे सपने लेकर जेबोमे कुछ आशाए, दिल में अरमान यहीं की कुछ करजाएँ, सूरजसा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझे कबतक रोकोगे? अपनी हद रोषण करने से तुम मुझे कैसे रोकोगे, कैसे टोकोगे?, अशा शायराना अंदाजात पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका भगवानबाबांच्या भक्तांसमोर मांडली. पंकजा मुंडे यांनी या माध्यमातून त्यांच्या विरोधकांना उत्तर दिलंय. मात्र, पंकजा मुंडे यांनी कुणाचंही नाव न घेता टीका केल्यानं पक्षांतर्गत की विरोधी पक्षातील नेत्यांना इशारा दिला आहे. याशिवाय पंकजा मुंडे यांनी यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण आणि पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर देखील भाष्य केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI