Pankaja Munde | ‘…तर ओबीसी समाज तुम्हाला रस्त्यावर उतरु देणार नाही’ – मुंडेंचा माविआ सरकारला ईशारा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवलाय. औरंगाबादेत भाजपकडून आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवलाय. औरंगाबादेत भाजपकडून आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असं पकंजा मुंडे म्हणाल्या.

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर 50 टक्क्यांच्या खालचं आरक्षणही संपुष्टात आलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आधीच अध्यादेश काढला असता तर या निवडणुकीत त्याचा फायदा झाला असता. जर ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. माझं सरकारला आवाहन आहे, अध्यादेश टिकवून दाखवा आणि त्यानुसार निवडणूक घेऊन दाखवा. ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही रोज जात काढत होता त्याच मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण दिलं, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI