VIDEO : Pankaja Munde | राज्याने मदत केली आहे, पण केंद्र सरकारही संवेदनशील : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे या दिल्लीत आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. निवडणुका लढण्यात भाजपचा हातखंडा आहे. मी मध्यप्रदेशची प्रभारी आहे. मी परवा मध्यप्रदेशात जाणार आहे. खंडवात निवडणूक सुरू आहे. तीन विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक सुरू आहे.

पंकजा मुंडे या दिल्लीत आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. निवडणुका लढण्यात भाजपचा हातखंडा आहे. मी मध्यप्रदेशची प्रभारी आहे. मी परवा मध्यप्रदेशात जाणार आहे. खंडवात निवडणूक सुरू आहे. तीन विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक सुरू आहे. मी त्याचा प्रचार करणार आहे. प्रत्येक नेत्याला आपले विभाग दिले आहेत. निवडणुकीची जोरात तयारी सुरू आहे. प्रत्येकजण काम करत आहे, असं सांगतानाच आमचा संकल्प हा अंत्योदयाचा आहे. राजकीय पावलं उचलतो तसं सामाजिक पावलंही उचलणार आहोत. त्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली, असं पंकजा यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI