Pankaja Munde | पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली, काही दिवस आराम करणार असल्याची ट्विटरवर माहिती

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Oct 01, 2021 | 8:18 PM

फडणवीस हे वाशिम जिल्ह्यातून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात मराठवाड्याचाही समावेश असेल. अशावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आजारी आहेत.

मुंबई : संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील अन्य काही भागात पावसानं थैमान घातलं. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं आणि जमिनीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदील बनलाय. अशावेळी राज्य सरकारनं तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांसह विरोधी पक्षातील नेते करत आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्याची घोषणा केलीय. फडणवीस हे वाशिम जिल्ह्यातून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात मराठवाड्याचाही समावेश असेल. अशावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आजारी आहेत. पंकजा यांनी स्वत: याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. फडणवीसांकडून दौऱ्याची घोषणा आणि पंकजा मुंडे आजारी पडणं यामुळे आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI