काळ आला होता पण वेळ आली नव्हती; रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली, नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील पाटस रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली असून, एका महिलेचा थरारक पद्धतीने जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक समोरून रेल्वे येत असल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने प्रसंगावधान राखत तात्काळ रेल्वे ट्रॅकवर झोपण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वे तिच्यावरून गेली, मात्र सुदैवाने महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही आणि तिचा जीव थोडक्यात बचावला.
पुणे जिल्ह्यातील पाटस रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली असून, एका महिलेचा थरारक पद्धतीने जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक समोरून रेल्वे येत असल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने प्रसंगावधान राखत तात्काळ रेल्वे ट्रॅकवर झोपण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वे तिच्यावरून गेली, मात्र सुदैवाने महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही आणि तिचा जीव थोडक्यात बचावला. या संपूर्ण घटनेचा थरार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पाटस रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत तातडीने या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या मते, योग्य सुविधा नसल्यामुळे दररोज प्रवाशांचा जीव धोक्यात येत असून, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता कायम आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Published on: May 09, 2026 02:05 PM
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट

