पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर दुसऱ्यानं कुलरवर पाय ठेवून…
पुणे विद्यापीठात चाललंय काय? पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. नेमकं काय घडलं बघा व्हिडीओ
गेल्या दोन दिवसांपूर्वी पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात धक्कादायक घटना घडली होती. बाहेरून पिझ्झा मागवल्याने थेट विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला होता. पिंपरी शहरातील मोशी परिसरात समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतीगृह आहे. याच ठिकाणी असलेल्या काही विद्यार्थिनींनी खाण्यासाठी पिझ्झा मागवला होता. ही बाब वसतिगृहाच्या प्रमुख मिनाक्षी नारहारे यांना कळली आणि त्यांनी एक अजब फतवा जारी करत एका खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थींनींपैकी नेमका पिझ्झा कुणी मागवला हे स्पष्ट होत नसल्याचे कारण देत चौघीणांही एका महिन्यासाठी हॉस्टेलवर राहण्यास बंदी घातल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आज पुणे विद्यापीठातील दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. पुणे विद्यापीठात कुलरवर पाय ठेवून पाणी काढल्याची घटना समोर आली आहे. पुणे विद्यापीठातील कॅन्टीनमधला हा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान कालच पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याला उंदीर चावला होता. वसतिगृहात उंदीर असूनही दुर्लक्ष असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. पुणे विद्यापीठातील भोंगळ कारभाराच्या या दोन घटना समोर आलेल्या आहेत. घडलेल्या घटना संदर्भातल्या कुठल्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? याबद्दल सुद्धा विद्यापीठ प्रशासनाकडून कुठलेही उत्तर देण्यात आलेले नाहीये.

'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप

नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं

'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा
