हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् ‘त्या’ चौघींना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री, असं काय घडलं?
बाहेरुन पिझ्झा मागवल्याने समाजकल्याण वसतिगृहातून विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. बाहेरून पिझ्झा मागवल्याने थेट विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी शहरातील मोशी परिसरात समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतीगृह आहे. याच ठिकाणी असलेल्या काही विद्यार्थिनींनी दोन दिवसांपूर्वी खाण्यासाठी पिझ्झा मागवला होता. ही बाब वसतिगृहाच्या प्रमुख मिनाक्षी नारहारे यांना कळली आणि त्यांनी एक अजब फतवा जारी करत एका खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थींनींपैकी नेमका पिझ्झा कुणी मागवला हे स्पष्ट होत नसल्याचे कारण देत चौघीणांही एका महिन्यासाठी हॉस्टेलवर राहण्यास बंदी घातली आहे. हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेरील व्यक्ती किंवा खाद्य पदार्थ आणण्यास निमानुसर बंदी आहे. मात्र हा नियम मुलींनी पिझ्झा मागवला आणि त्यामुळे कारवाई केली जात असल्याचे म्हणत विद्यार्थिनी आणि पालकांना एका लेखी पत्राद्वारे कळविण्यात आलं आहे. दरम्यान, अशा चुकांसाठी विद्यार्थिनी प्रवेश बंदी करण्याचे आदेश समजिक न्याय विभागाने परित केले आहेत का? याचा खुलासा होत नसल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

