‘माझ्याकडच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढेन’, धनंजय मुंडेंना इशारा देत करूणा शर्मांचा सदावर्तेंवर गंभीर आरोप, ’50 लाख घेतो..’
आपल्या मुलांना त्रास दिला तर कोण कशाची दलाली करत होतं ते सर्व बाहेर काढू असा इशारा करुणा मुंडे यांनी दिलाय. दुसरीकडे सदावर्ते सारखे लोकं फक्त बोलण्यासाठी पन्नास लाख घेतात असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता.
आपल्या मुलांना त्रास दिला तर कोण कशाची दलाली करत होतं ते सर्व बाहेर काढू असा इशारा करुणा मुंडे यांनी दिलाय. दुसरीकडे सदावर्ते सारखे लोकं फक्त बोलण्यासाठी पन्नास लाख घेतात असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. मुलावर दबाव आणाल तर माझ्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढेन असा इशारा करुणा मुंडेनी धनंजय मुंडेंना दिलाय. त्यावर धमक्या देण्याऐवजी काय असेल ते उघड करावं असं आवाहन सत्ताधारी यांपैकीच काही नेत्यांनी केले. तर दुसरं म्हणजे सदावर्ते हा माझ्यासाठी वकील नाही. हा माणूस फक्त बोलण्यासाठी पन्नास पन्नास लाख रुपये घेतो असा गंभीर आरोपही करुणा मुंडेनी सदावर्तेवर केलाय. ‘सदावर्ते जे वकील आहे ते माझ्यासाठी वकील पण नाहीये. जेव्हा माझ्या गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर टाकली गेली होती. माझे लोक त्यांच्याकडे गेले होते… त्यावेळी देखील धनंजय मुंडे मंत्री होते. त्यांना सांगितलं तुम्ही केस लढा तर फक्त बोलण्यासाठी ते पन्नास लाख रूपये मागायचे. अशा लोकांना मी वकील मानत नाही. लोकं खोटं बोलण्यासाठी ५० लाख रूपये मागताय, असं म्हणत करूणा शर्मा यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर माझ्या वकिलांनी एक पण रूपया घेतला नाही त्यांचे आभार मी मानू नको का? असा सवालही करूणा मुंडेंनी केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
