PM Modi : लोकशाहीची जननी भारत, गुलामीच्या मानसिकतेतून भारताला मुक्त करणारच… PM मोदींचा निर्धार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या प्रांगणात भारताच्या समृद्ध वारशावर गर्व करण्यावर आणि गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्त होण्यावर भर दिला. 1835 मध्ये मॅकॉलेने रुजवलेलेल्या मानसिक गुलामगिरीतून देशाला 2035 पर्यंत बाहेर काढण्याचे आवाहन त्यांनी केले. भारत लोकशाहीची जननी असल्याचे सांगत, त्यांनी स्वदेशी अस्मिता आणि आत्मविश्वासाच्या पुनरुत्थानाचे महत्त्व अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात भारताच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान आणि गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती यावर भर दिला. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रांगणात कोविदार वृक्षाची पुन्हा प्रतिष्ठापना होणे हे केवळ एका चिन्हाची वापसी नसून, ती भारताच्या स्मृतीची वापसी, अस्मितेचे पुनर्जागरण आणि स्वाभिमानी सभ्यतेचा पुनरुद्घोष आहे असे त्यांनी नमूद केले. वाल्मिकीजींनी रामायणात लक्ष्मणाने कोविदार ध्वजावरून अयोध्येच्या सैन्याची ओळख कशी केली होती, याचे वर्णन पंतप्रधानांनी केले. कोविदार वृक्ष आपल्याला आपली ओळख विसरल्यास आपण स्वतःला कसे हरवून बसतो आणि ओळख परत आल्यास राष्ट्राचा आत्मविश्वासही कसा परत येतो याची आठवण करून देतो, असे ते म्हणाले. देशाला पुढे जायचे असेल तर आपल्या वारशावर गर्व करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

