ट्रम्प मोदींना म्हणाले…मिस यू! डोनाल्ड राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधानांचा पहिलाच दौरा, भेटीत काय-काय चर्चा?
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचा दौरा केला आहे. या दौऱ्यामध्ये नेमकं काय झालं? मोदींच्या या दौऱ्याचा भारताला काय फायदा होणार आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे सूत्र हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिलाच अमेरिका दौरा केला. फ्रान्समधल्या एआय समिट नंतर पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले आणि व्हाइट हाऊसमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये भेट झाली. व्यापारी तूट कमी करण्यासाठी भारत अमेरिकेकडून एफ-35 लढाऊ विमान, तेल, वायू आणि लष्करी उपकरण खरेदी करणार आहे. जितकं टॅरिफ इतर देश अमेरिकेवर लावतात, तेवढंच टॅरिफ अमेरिका आता इतर देशांवर लावणार आहे. मुंबई हल्ल्याप्रकरणी भारताला हवा असलेल्या तहव्वूर राणांचं प्रत्यार्पण केलं जाणार आहे. भारत आणि अमेरिकेमधला द्विपक्षीय व्यापार आणि संबंध अधिक मजबूत होणार आहेत. अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे राहत असलेल्या भारतीयांबद्दल पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या कोणत्याही भारतीयाची पडताळणी झाल्यास त्यांना भारतात परत नेण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणारे हे नागरिक सामान्य कुटुंबातले आहेत. मानवी तस्कर त्यांना मोठी स्वप्न दाखवतात, मोठी आश्वासन देतात. अमेरिकेत बेकायदेशीरपणे होणारी मानवी तस्करी रोखण्याची गरज आहे असं मत मोदींनी व्यक्त केलं आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
