अजित पवार धनंजय मुंडे यांच्या पाठिशी, तूर्तास मंत्रिपद शाबूत अन् थेट कोअर कमिटीत स्थान
मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला तूर्तास धक्का लागणार नाही हे स्पष्ट झाले आहे. पुराव्याशिवाय कारवाई नाही हे पुन्हा एकदा बैठकीत अजित पवार यांनी निश्चित केलं. तसंच सात जणांच्या कोर कमिटीमध्येही धनंजय मुंडे यांना स्थान दिले आहे.
वाल्मिक कराड आणि पीकविमा घोटाळ्यासह इतर प्रकरणामध्ये अजित पवारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला. देवगिरीच्या बैठकीत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा नाही, अशी भूमिका पुन्हा एकदा घेण्यात आली आहे. तर आगामी महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सात जणांची कोर कमिटी स्थापन करण्यात आली. त्यातही धनंजय मुंडे यांना स्थान देण्यात आले आहे. दोन दिवसांआधीच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. पण दादांनी भेट नाकारली. पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजनाच्या 877 कोटींच्या निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप सुरेश धसांचा आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जवळजवळ दोन तास यामध्ये खलबतं झाली. ज्यात पुराव्यांवर बोट ठेवत अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. धनंजय मुंडे दोषी ठरत नाही तोपर्यंत कारवाई नाही असं अजित पवार म्हणाले. मुंडेवरील आरोप पुरावे देऊन जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत कारवाई नाही. बीड प्रकरणात तिहेरी चौकशी सुरू असून अहवाल आल्यावर पुढचा निर्णय घेऊ असे अजित पवार म्हणाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

