कोकणात ठाकरेंना जबर धक्का, राजन साळवींनंतर आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? उदय सामंत म्हणाले…
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. तर साळवी सोबत येताच शिंदेंच्या शिवसेनेनं कोकणातील ठाकरेंचे एकमेव आमदार भास्कर जाधवांनाही ऑफर दिली आहे.
अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन तोडून माझी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि कोकणात शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला. केसेसला पळून घाबरून गेले अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या आरोपात राजन साळवी यांची याआधी एसीबीकडून चौकशी झाली. त्यांच्या घरी एसीबीचे छापे पडलेत. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी टीका केली. तर कालच्या पिक्चरचा डायलॉग मारत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. राजन साळवी यांनी धनुष्यबाण हाती घेताच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर खापर फोडलं. माझ्या विरोधात विनायक राऊतांनी किरण सामंताचं काम केलं असा आरोप राजन साळवींनी केला. ऑपरेशन टायगरनुसार कोकणात शिंदेंच्या शिवसेनेनं मोठा धक्का उद्धव ठाकरेंना दिला. आता कोकणाचा विचार केला तर एकच आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा इथे शिल्लक आहे.
कोकणात एकूण १५ आमदारांपैकी १४ आमदार महायुतीचे. एकच भास्कर जाधव मविआत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. शिंदेंचे एकूण ८ आमदार आहेत. ज्यात कर्जतमध्ये महेंद्र थोरवे, अलिबागमध्ये महेंद्र दळवी, महाडमध्ये भरत गोगावले, रत्नागिरीत उदय सामंत, राजापूरमध्ये किरण सामंत, दापोलीत योगेश कदम, कुडाळमध्ये निलेश राणे आणि सावंतवाडीत दीपक केसरकर आमदार आहेत. भाजपचे पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर, पेणमध्ये रवींद्र पाटील, उरणमध्ये महेश बालदी आणि कणकवलीत नितेश राणे आमदार आहेत. दरम्यान, राजन साळवींनी पक्षप्रवेश करताच उदय सामंतांनी ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांच्याकडे मोर्चा वळवला. जाधवांनाही सामंतांनी खुली ऑफर दिली.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन

