‘अरे चल… फालतू, मूर्ख…’, शिंदेंच्या मंत्र्याकडे स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल अन् ठाकरेंचा खासदार भडकला, पत्रकारांवरच आरेरावी
ठाकरे आणि राऊत ज्या शिंदेंवर हल्लाबोल करतात त्याच शिंदेंच्या एका मंत्र्याने स्नेहभोजनाचं आयोजन केल्यानंतर ठाकरेंची तीन खासदार हजेरी लावतात… हे सर्वांसाठी काहिसं भुवय्या उंचावणारं आहे.
मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल राजधानी दिल्लीत सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या तीन खासदारांनी स्नेहभोजनाला हजेरी लावली होती. दरम्यान यावरून चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते आदित्य ठाकरे यांनी खासदारांना सक्त सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. इतकंच नाहीतर आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे गटातील खासदारांना सूचना दिल्यानंतर खासदारांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचेही सांगितले जात आहे. तर मंत्र्यांनी बोलवल्यानंतर जायला हवं, असं म्हणत शिवसेनेतील खासदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली. दरम्यान, यासंदर्भात पत्रकारांनी संजय जाधव यांना सवाल केला असता ते पत्रकारांवरच भडकल्याचे पाहायला मिळाले. नुसतेच भडकले नाहीतर त्यांनी आरेरावी केल्याचेही सांगितले जात आहे. ‘जेवणासाठी बोलावलं तर जाऊ नये का?’ असा सवालच संजय जाधव यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, २००४ साली प्रतापराव जाधव आणि मी सोबत आमदार होतो. मी फुटलेला नाही. बाकी सांगू नको. माझ्या पक्षाचे नेते आहेत मी भेट घेतं चुकीचं आहे का? ऑपरेशन टायगर वैगरे सगळे फेल आहे. तर अशा बातम्या तुम्ही लावता म्हणजे तुमचा मुर्खपणा आहे, असं म्हणत संजय जाधव यांनी चांगलंच फटकारल्याचं पाहायला मिळालं.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
