शिंदेंच्या केंद्रीय मंत्र्याच्या घरी स्नेहभोजनासाठी उद्धव ठाकरेंचे ‘हे’ 3 खासदार, दिल्लीतून ‘उबाठा’ला भगदाड?
ठाकरे आणि राऊत ज्या शिंदेंवर हल्लाबोल करतात त्याच शिंदेंच्या एका मंत्र्याने स्नेहभोजनाचं आयोजन केल्यानंतर ठाकरेंची तीन खासदार हजेरी लावतात... हे सर्वांसाठी काहिसं भुवय्या उंचावणारं आहे.
शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी स्नेहभोजनाला हजेरी लावल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल राजधानी दिल्लीत सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या तीन खासदारांनी स्नेहभोजनाला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते नुकताच एक पुरस्कार प्रदान करून जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे आणि राऊत ज्या शिंदेंवर हल्लाबोल करतात त्याच शिंदेंच्या एका मंत्र्याने स्नेहभोजनाचं आयोजन केल्यानंतर ठाकरेंची तीन खासदार हजेरी लावतात… हे सर्वांसाठी काहिसं भुवय्या उंचावणारं आहे. अशातच ठाकरे गटाच्या खासदारांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, परवा शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात संजय दिना पाटील हे देखील उपस्थित होते. त्यावरूनही चर्चा सुरू आहेत.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
