AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोक्यावर भगवी पगडी अन् लंगरमध्ये बनले वाढपी, नरेंद्र मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा

डोक्यावर भगवी पगडी अन् लंगरमध्ये बनले वाढपी, नरेंद्र मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 13, 2024 | 1:36 PM
Share

मोदी यांनी सोमवारी बिहारमधील गुरुद्वारा पटना साहिबला भेट दिली, जिथे त्यांनी लंगरची सेवा केली. भगवी पगडी घालून, ते गुरुद्वारा येथे स्वयंपाक करताना दिसले. मोदींनी लंगरमधील प्रसाद घेतला आणि त्यांनी लंगरसाठी सेवाही दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी लंगरमध्ये पोळ्या बनवल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिहारमधील गुरुद्वारा पटना साहिबला भेट दिली, जिथे त्यांनी लंगरची सेवा केली. भगवी पगडी घालून, ते गुरुद्वारा येथे स्वयंपाक करताना दिसले. मोदींनी लंगरमधील प्रसाद घेतला आणि त्यांनी लंगरसाठी सेवाही दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी लंगरमध्ये पोळ्या बनवल्या. लंगरमध्ये प्रसादासाठी बसलेल्या भाविकांना जेवणही वाढले. पंतप्रधान जवळपास 20 मिनिटे गुरुद्वारात होते. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्यासह राज्याच्या राजधानीत रोड शो केल्यानंतर मोदींनी श्री हरिमंदिर जी पटना साहिबला भेट दिली. मोदी सोमवारी हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि सारण येथे एनडीएच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या बाजूने निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा सेवा देतानाचा व्हिडीओ

Published on: May 13, 2024 01:36 PM
Follow Us