Pooja Chavan Case | Audio Clip | ‘ती सतत तुम्हाला भेटायचं म्हणते’, कार्यकर्त्याची कथित मंत्र्याला माहिती, सहावी ऑडिओ क्लिप
या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. (Pooja Chavan Death Case Sixth Viral Audio Clip)
मुंबई : बीड येथील पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. कथित मंत्री आणि त्याच्या कार्यकर्त्याच्या संभाषणाच्या या क्लिप्स आहेत. (Pooja Chavan Death Case Sixth Viral Audio Clip)
अरूण राठोड असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. तसेच तो या मुलीचा चुलत भाऊ असल्याचंही त्या कार्यकर्त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. पूजाच्या आत्महत्येपूर्वीपासून ते आत्महत्येनंतरचं संभाषण या क्लिपमध्ये आहे. त्यातून पूजा कोणत्या मानसिकतेत होती आणि ती कसली तरी ट्रीटमेंट घेत असल्याचं स्पष्ट होत आहे.
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
