लोकशाहीत कुणालाही मुख्यमंत्री होता येतं, Praful Patel यांची नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

| Updated on: Jun 19, 2021 | 2:33 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यावरही पटेल यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही सांगून टाकला. लोकशाहीत कुणालाही मुख्यमंत्री होता येतं. ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील आणि ज्यांना लोकांचा पाठिंबा असेल तो मुख्यमंत्री होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

लोकशाहीत कुणालाही मुख्यमंत्री होता येतं, Praful Patel यांची नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
Follow us on

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यावरही पटेल यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही सांगून टाकला. लोकशाहीत कुणालाही मुख्यमंत्री होता येतं. ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील आणि ज्यांना लोकांचा पाठिंबा असेल तो मुख्यमंत्री होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या बहुमत महाविकास आघाडीकडे आहे आणि आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे आता जागा रिकामी नाही, असा चिमटाही त्यांनी पटोले यांना काढला. दरम्यान, पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला सांगून आगामी काळात मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादीचाही दावा असणार असल्याचे संकेतच दिले आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.