Bachchu Kadu यांचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, ‘अन्यथा अंत व्हायला वेळ लागणार नाही’
VIDEO | जालना येथे उपोषण करत असलेले मराठा अंदोलक मनोज जरांगे यांची प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी घेतली भेट, भेटीदरम्यान काय झाली चर्चा? अन् कुणबी नोंद असलेल्यांना ओबीसीची प्रमाणपत्र द्यावं अशी केली मागणी
जालना, ५ सप्टेंबर २०२३ | प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी काल जालन्यात दाखल होत उपोषणकर्ते, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी असे म्हटले की, आमच्याकडून जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आम्ही करू सरकारने आंदोलनाकडे आंदोलन म्हणून पहावे, पण इथे येणाऱ्याला सेल्फीचं पडल आहे. त्यांच्या आरोग्याचं काही पडलं नाही. आज या लोकांनी जी ज्योत पेटवली आहे. त्याचा सन्मान करणं हे महत्त्वाचे आहे. वेळ पडली तर मी देखील उपाशी राहण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे सरकारने कोणताही अंत पाहू नये, अन्यथा पुन्हा एकदा सरकारचा अंत व्हायरला वेळ लागणार नाही. तर महाराष्ट्रात मराठा कुणबी आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे सरकारने वेगळा कायदा करण्याच्या भानगडीत पडू नये, असे म्हणत थेट इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका

