‘त्या’ प्रश्नावरून प्रकाश आंबेडकर पत्रकारावर भडकले; म्हणाले, “या राजकारणातला मी बाप..”
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेड दौऱ्यावर असलेल्या प्रकाश आंबेडकरांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल करण्यासाठी घेरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी प्रकाश आंबेडकर भडकल्याचे पाहायला मिळाले. मी राजकारणाला बाप आहे हे लक्षात घ्या... असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
जर कुणबी मराठा डबल भूमिका घेत असेल, तर विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी एकही कुणबी मराठा उमेदवार देणार नाही आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी केला. प्रकाश आंबेडकर सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावरून आंबेडकरांनी पत्रकारांना उलट प्रश्न करून संताप व्यक्त केला. तुम्हाला हा प्रश्न कोणी विचारायला सांगितला? असं प्रत्युत्तर देत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसवाल केला. पुढे प्रकाश आंबेडकर पत्रकारांना असेही म्हणाले की, एक लक्षात घ्या… तुझं जेवढं वय नाही ना… तेवढे वर्ष माझी पत्रकारित गेली आहेत. हे पेड विचारणारे प्रश्न आहेत. मला नका विचारू, इतरांना विचारा. या राजकारणातील मी बाप आहे एवढं लक्षात घ्या, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीना फटकारलं आहे.
Latest Videos
Latest News