Chitra Wagh : प्रमोद कोंढरेवर कठोर कारवाई करणार; चित्रा वाघ यांची ग्वाही
Chitra Wagh News : पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने केलेल्या विनयभंग प्रकरणी चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे.
प्रमोद कोंढरे याला तत्काळ पदमुक्त करण्यात आलं आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हंटलेलं आहे. कोंढरेला काठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयात्न करणार असल्याच देखील भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे. आपल्या एक्स अकाऊंटवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट केलेली आहे.
या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे की, आताच यासंदर्भात मी पुण्याचे भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे जी यांच्याकडून माहीती घेतली असता संबंधित पदाधिकाऱ्याला तात्काळ पदमुक्त केल्याची माहीती त्यांनी दिली इतकच नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आली आहे. अर्थात, आम्ही इतक्यावरच थांबणार नाही त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. भारतीय जनता पक्ष हा संविधान, कायदा आणि महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत, महिला सशक्ततेविरुद्ध मग तो आमच्या पक्षाचा का असेना वागणाऱ्याला कधीही माफ केले जाणार नाही, असं चित्रा वाघ म्हणल्या.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

