जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भावुक झाल्याचं सांगत, वैयक्तिक व्यंग किंवा कुटुंबीयांवर टीका करणं योग्य नसल्याचं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत सरकारकडून सातत्याने चर्चा सुरू असून, 14 एसओपींपैकी जवळपास 10 ते 11 कामं पूर्णत्वाकडे गेल्याचा दावा लाड यांनी केला. आंदोलकांनी आक्रमक राहावं, मात्र ही आक्रमकता विषयापुरती मर्यादित […]
मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भावुक झाल्याचं सांगत, वैयक्तिक व्यंग किंवा कुटुंबीयांवर टीका करणं योग्य नसल्याचं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत सरकारकडून सातत्याने चर्चा सुरू असून, 14 एसओपींपैकी जवळपास 10 ते 11 कामं पूर्णत्वाकडे गेल्याचा दावा लाड यांनी केला. आंदोलकांनी आक्रमक राहावं, मात्र ही आक्रमकता विषयापुरती मर्यादित असावी आणि ती भरकटता कामा नये, अशी विनंतीही त्यांनी जरांगे पाटील यांना केली.
दरम्यान, मनोज जरांगे सध्या दौऱ्यावर असून 17 तारखेनंतर अंतरवाली सराटीत जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलं. बावनकुळे यांच्याबाबत जरांगेंचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Published on: Aug 14, 2026 11:24 AM
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...

