महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा, पाहा कोण ?
नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे.आता या पदासाठी राष्ट्रवादीतील दोन नेत्यांची चर्चा सुरु आहे.
नाशिक भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. अशोक खरात याची पाद्यपुजा करतानाचा आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरल्याचे रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अनेकांनी पत्रकार परिषदा घेऊन त्यांच्यावर टीका केल्यानंतर काल शुक्रवारी रात्री महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे.यानंतर आता पुढच्या अध्यक्ष कोण होणार याची राष्ट्रवादी पक्षात चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला महिला आयोगाचे अध्यक्ष पद असल्याने राष्ट्रवादीतील दोन महिलांचा या नावासाठी चर्चा सुरु आहे.वैशाली नागवडे आणि प्रतिशा शिंदे या दोघींचा या पदासाठी चर्चा सुरु असल्याचे समजते. वैशाली नागवडे या पुण्याच्या आहेत तर प्रतिशा शिंदे या उत्तर महाराष्ट्रातील आहेत.
Published on: Mar 21, 2026 04:20 PM
खासदार निधीच्या आरोपांवर ओमाराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले एक रुपय
ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र नाही आता
कोण होतास तू, काय झालास तू...; विधानसभेत शिंदेंकडून टोलेबाजी
कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत...

