Pravin Darekar | नवाब मलिक प्रवक्ते की ओकते, प्रवीण दरेकर यांचा नवाब मलिकांवर घणाघात

नवाब मलिक यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे. याच कारणामुळे ते सुडाच्या भावनेतून बोलत आहेत. एनसीबीने केलेली कारवाई चुकीची असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न नवाब मलिक यांच्याकडून सुरु आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले.  

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर सडकून टीक केली आहे. नवाब मलिक प्रवक्ते आहेत की ओकते आहेत, हे मला माहिती नाही. कारण आता ते तपास यंत्राणांवर संशय घेत आहेत. एनसीबीने केलेली कारवाई चुकीची आहे. ते अमली पदार्थ नव्हते, असा दे दावा करत आहेत. नवाब मलिक यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे. याच कारणामुळे ते सुडाच्या भावनेतून बोलत आहेत. एनसीबीने केलेली कारवाई चुकीची असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न नवाब मलिक यांच्याकडून सुरु आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI