तेव्हा ते मातोश्रीवर बसून होते, प्रविण दरेकरांचा औरंगाबाद दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
आज उद्धव ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावरून वातावरण चांगलचं तापलं आहे. प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई : आज उद्धव ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावरून वातावरण चांगलचं तापलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावरून भाजप नेते प्रविण दरेकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. उशिरा का होत नाही पण उद्धव ठाकरे यांना शाहानपण सूचलं. ज्यावेळी हाती सत्ता होती, तेव्हा त्यांना बाहेर फिरण्यास वेळ नव्हता, लोकांना भेटण्यास वेळ नव्हता, तेव्हा ते फक्त मातोश्रीवर बसून होते असं दरेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. अंबादास दानवे हे अपरिपक्व नेते असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.
Published on: Oct 23, 2022 02:57 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

