Raigad | रायगडावर शिवरायांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून अभिवादन

रयतेच्या सार्वभौम स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती माननीय श्री रामनाथ कोविंद जी सहकुटुंब आले होते. यावेळी छत्रपती परिवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत राजसदरेवर अतिशय दिमाखदार सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रपती महोदयांना छत्रपती शिवरायांच्या पट्टा या शस्त्राची, मराठा धोप व सुवर्ण होणाची प्रतिकृती तसेच आज्ञापत्रातील एक उतारा आदरपूर्वक भेट म्हणून देण्यात आला.

रयतेच्या सार्वभौम स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती माननीय श्री रामनाथ कोविंद जी सहकुटुंब आले होते. यावेळी छत्रपती परिवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत राजसदरेवर अतिशय दिमाखदार सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रपती महोदयांना छत्रपती शिवरायांच्या पट्टा या शस्त्राची, मराठा धोप व सुवर्ण होणाची प्रतिकृती तसेच आज्ञापत्रातील एक उतारा आदरपूर्वक भेट म्हणून देण्यात आला.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील वस्तूंच्या या प्रतिकृती माझ्यासाठी वंदनीय व प्रेरणादायी आहेत. या सर्व भेटवस्तू राष्ट्रपती भवनातील संग्रहालयात सन्मानपूर्वक ठेवण्यात येतील,” असे राष्ट्रपती महोदयांनी यावेळी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी, सुश्री स्वातीजी कोविंद, अ.सौ. युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती व पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI