PM Modi On Corona | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यांना सूचना -tv9

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज देशातील कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक घेतली. मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा विळखा (Corona Outbreak) अधिक घट्ट होताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज देशातील कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक घेतली. मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. देशातील सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक आकडे समोर येत आहेत. अशावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज देशभरात 1 लाख 59 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 5 लाख 90 हजारापेक्षा अधिक आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत स्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत या बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.

Published On - 9:00 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI