Special Report | Hindustani Bhau चा हिशेब ‘फुरसती’न?-TV9
मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला दोषी धरत हिंदुस्तानी भाऊला अटक केली आहे. कोर्टाने त्याला तीन दिवसांची कोठडीही सुनावली आहे. त्यानंतर नागपूर पोलिसही हिंदुस्तानी भाऊला ताब्यात घेणार आहेत, त्यामुळे हिंदुस्तानी भाऊचा पाय आणखी खोलात जाताना दिसतोय.
धारावीतल्या विद्यार्थी आंदोलनाने फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. हे आंदोलन एवढं आक्रमक होतं की सुरूवातील राज्य सरकारला घाम फुटला. यानंतर राज्यचे पोलीस खातेही खडबडून कामला लागले आणि या आंदोलनामागील शक्ती शोधण्यास सुरूवात झाली. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला दोषी धरत हिंदुस्तानी भाऊला अटक केली आहे. कोर्टाने त्याला तीन दिवसांची कोठडीही सुनावली आहे. मात्र या आंदोलनानंतर भाजपनेही राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार न करता पोलीस लाठीमार करत आहेत, असी टीका भाजपकडून करण्यात आली. त्यामुळे परीक्षांबाबत काय करायचं? यासाठी शिक्षण विभाग आणि राज्य सरकारकडून काही तातडीच्या बैठका घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे या आंदोलनातून काहीही साध्य न होताना दिसतंय.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

