Kolhapur | कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरातील बिंदू चौकात पुरोगामी संघटनांकडून राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी कार्यकर्ते एकत्र जमले असून, यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण अधिकच चिघळले.
कोल्हापुरातील बिंदू चौकात पुरोगामी संघटनांकडून राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी कार्यकर्ते एकत्र जमले असून, यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण अधिकच चिघळले. आंदोलकांकडून “कोल्हापूर पोलिसांचा धिक्कार असो” अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच संबंधित आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, आंदोलकांकडून प्रतीकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी त्यास विरोध करत इशारा दिला होता. तरीही कार्यकर्ते पुतळा दहनासाठी तयारी करत असल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली.
सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त कायम असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Published on: Apr 27, 2026 12:28 PM
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक

