“मी स्वाभिमानी, शिंदे-फडणवीस शब्द पाळतात”, प्रताप सरनाईक मंत्रिपदासाठी इच्छुक?
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची आस शिवसेना आणि भाजपचे नेते लावून बसले आहेत. त्यात राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्याने कोणाला कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. अशातच शिवसेना नेते प्रताप सरनाई यांनी मंत्रिपदासाठीची इच्छा व्यक्त केली आहे.
ठाणे: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दिवसेंदिवस लांबणीवर गेला आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराची शिवसेना आणि भाजपचे नेते आस लावून बसले आहेत. त्यात राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्याने कोणाला कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. अशात शिवसेना नेते प्रताप सरनाई यांनी मंत्रिपदासाठीची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे गेल्या आठवड्यापासून आम्ही ऐकत आहोत. तीन पक्षाचे सरकार आहे, काहीतरी तडजोडी करावे लागतात. हळूहळू अडचणी येतात त्यावर सरकार मात करून आम्ही पुढे जात आहोत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मला मंत्री करा म्हणून मी…” प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

