सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक; मातोरी गावात काय घडलं?
अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. हे प्रकरण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, आर्थिक, शारीरिक किंवा इतर लोभासाठी फसवणूक होत असल्याचं वारंवार दिसून येत आहे. असाच भयंकर प्रकार महाराष्ट्रातील बीड येथे घडला. लग्न काही दिवसांवर आलेले असताना पीएसआय नवरदेवाने लग्नाला नकार दिला.
अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. हे प्रकरण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, आर्थिक, शारीरिक किंवा इतर लोभासाठी फसवणूक होत असल्याचं वारंवार दिसून येत आहे. असाच भयंकर प्रकार महाराष्ट्रातील बीड येथे घडला. लग्न काही दिवसांवर आलेले असताना पीएसआय नवरदेवाने लग्नाला नकार दिला. या नकारानंतर एकच खळबळ उडाली. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या लहान गावातील हा प्रकार समोर येताच सगळ्यांना धक्का बसला.
नवरदेवाने सोनं, कपड्यांसह 14 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. इतकेच नाही, तर वस्तूंच्या देवाणघेवाणीवरूनही दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वादविवाद झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दल सखोल तपास करत आहे.
Published on: May 26, 2026 05:40 PM
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र

