AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंच Prabhakar Sail चा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती

पंच Prabhakar Sail चा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती

| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 10:08 AM
Share

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील (Cordelia cruise drug case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला. साईल यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल (शुक्रवारी) प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांचे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे साईल यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती आहे.

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील (Cordelia cruise drug case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला. साईल यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल (शुक्रवारी) प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांचे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे साईल यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती आहे. मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर सापडलेल्या ड्रग्जमुळे गेल्या वर्षी एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी कारवाई करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार म्हणून प्रभाकर साईल यांच्यासह काही जणांनी काम केलं होतं. मात्र प्रभाकर साईल यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी प्रभाकर साईल यांचे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे साईल यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.