Pune | पुण्यात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला, 6 जणांची प्रकृती गंभीर,12 जखमी
अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी 12 जणांना जखमी अवस्थेत दवाखान्यात नेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. स्लॅबचा संपूर्ण लोखंडी सांगाडा कोसळल्याचे यावेळी दिसून आले. त्याखाली दबल्याने काहीजणांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेविषयी अजूनही प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पुण्यात एका निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती समोर आली आहे. बालेवाडीच्या पाटील नगर परिसरात शनिवारी रात्री हा प्रकार घडला. स्लॅब अचानक कोसळल्यामुळे अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले गेले. यापैकी 12 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी 12 जणांना जखमी अवस्थेत दवाखान्यात नेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. स्लॅबचा संपूर्ण लोखंडी सांगाडा कोसळल्याचे यावेळी दिसून आले. त्याखाली दबल्याने काहीजणांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेविषयी अजूनही प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Latest Videos
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले