…म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं, आरोपीचा काळा इतिहास समोर
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारलं, दरम्यान, आरोपीचा काळा इतिहास सगळ्यांसमोर आला आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारलं, इतकेच नाही तर नंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवलं. ही घटना इतकी किळसवाणी होती की अंगावर काटा येईल. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, आरोपीचा काळा इतिहास सगळ्यांसमोर आला आहे.
आरोपी याआधीही दोन आरोपांमधून निर्दोष सुटला होता. यावेळी त्याची ओळख मोबाईलमुळे पटली असावी, तेव्हापासून त्याने मोबाईल वापरणं बंद केलं होतं. या प्रकरणात त्याची ओळख करणं खूप कठीण होतं. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमुळे त्याचे काळे कारनामे समोर आले होते. त्याच्या स्वतःच्या कुटुंबीयांनीही त्याला ठेचून मारण्याची मागणी केली आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

