Sanjay Raut | एकनाथ खडसे यांना ईडीचं समन्स, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने खडसेंनाही समन्स बजावलं होतं. ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. 

ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्याअगोदरच प्रकृती बिघडल्याच्या कारणास्तव त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे खडसे ईडी चौकशीला जाणार की नाही, याबाबत तर्कवितर्क रंगले होते. परंतु सकाळी अकराच्या सुमारास ते अंमलबजावणी संचलनायच्या कार्यालयात दाखल झाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI