तुम्हाला लाज वाटली पाहिजे! प्रफुल्ल पटेलांकडून राज ठाकरेंचा समाचार
राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून केलेल्या टिप्पणीवर प्रफुल्ल पटेलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पटेलांनी राज ठाकरेंना बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असे संबोधत टीका केली. आपण राष्ट्रीय अध्यक्ष होणार नसल्याचे स्पष्ट करत, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारच या पदासाठी योग्य असल्याचे संकेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरून राज ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेलांना डिवचले होते, पाटील हवा, पटेल नको असे ते म्हणाले होते. यावर प्रफुल्ल पटेल चांगलेच संतापले. राज ठाकरे किंवा इतर कोणी आमच्या पक्षाचा विधिमंडळ नेता किंवा अध्यक्ष कोण असावा, हे ठरवणार का, असा सवाल पटेलांनी केला. “आमच्याबद्दल किंवा आमच्या पार्श्वभूमीबद्दल कोणी टिप्पणी करत असेल, तर त्यांना लाज वाटायला पाहिजे,” असेही ते म्हणाले.
पटेलांनी आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती असल्याचे संकेत दिले. सुनेत्रा पवार यांची यापूर्वीच राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्या आणि उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे.
विमान अपघातामागे ऑपरेशन लोटस? संजय राऊतांचा गंभीर आरोप
तुम्हाला लाज वाटली पाहिजे! प्रफुल्ल पटेलांकडून राज ठाकरेंचा समाचार
पदासाठी घेतला लेकीचा जीव, कुठं चाललंय महाराष्ट्राचं राजकारण?
मीरा भाईंदरच्या महापौरपदी मेहता, मराठीप्रेमींचं आंदोलन

